आमच्याविषयी

ग्रामपंचायत उपवडे

आपले सहर्ष स्वागत आहे.
ही ग्रामपंचायत निसर्गरम्य व शांत वातावरणात वसलेली असून येथे स्वच्छ व आरोग्यदायी परिसर पाहायला मिळतो. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना विविध ऑनलाईन व ऑफलाईन सेवा पुरविल्या जातात तसेच आवश्यक विविध प्रकारचे दाखले दिले जातात. ही ग्रामपंचायत परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम असून येथील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असतात. निसर्गरम्य परिसर, शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा, लोकसहभागातून होणारी विकासकामे, पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांना येथे विशेष महत्त्व दिले जाते.

उपवडे गावामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गावामध्ये एक गाव एक गणपती आहे. शिवप्रेमी तरुण मंडळ, राजे ग्रुप उपवडे गावातील सर्व भाविक मोठ्या उत्साहात गणेशाची आरती करतात. गणेशाच्या आगमनापासून ते अनंत चतुर्थी पर्यंत दहा दिवस मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे केले जातात. ढोल ताशांच्या गजरात गणेशाचे विसर्जन करतात.

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत