ऐतिहासिक माहिती
करवीर तालुक्यातील उपवडे हे गाव कोल्हापुर शहरापासून २७ की.मी. अंतरावरती आहे.
केंद्र शासनाच्या संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत निर्मळ ग्राम पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची सन २००९-२०१० मध्ये निवड करण्यात आली आहे.
गावात सुरवातीला आगमन करताना अंबाबाई मंदिर लागते. पुरातन काळापासून अंबाबाई मंदिर प्रसिद्ध आहे.
अंबाबाई मंदिर एक जागृत देवस्थान व प्रेरणीय स्थळ आहे. डोंगर-कपा_यामध्ये हे देवस्थान बसलेले आहे.
अशा या डोंगर-कपा_यामध्ये बसलेल्या उपवडे गावाचा नावलौकिक पंचक्रोशीत आहे. दुसरा, जागर हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हजारो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात.